Wednesday, March 20, 2019

चवदार तळ्याच्या सत्याग्रहाने च बहुजनाची तहान भागवली. शारदा माळे

चवदार तळ्याच्या सत्याग्रहाने च बहुजनाची तहान भागवली. शारदा माळे     





  बिलोली  ता प्र( ए जी कुरेशी)       
 जनावरांना पाणी पिण्याची मुभा होती पण बहुजनांना मनाई होती तेंव्हा बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाड चवदार तळे सत्याग्रहाने तहान भागवली असे प्रतीपादन समतादुत शारदा माळे यांनी विद्यार्थी यांना मार्गदर्शन करताना केले.           डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे च्या वतीने महाड चवदार तळे सत्याग्रह आणी बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान यावर प्रबोधन कार्यक्रम जि.प.प्रा.शाळा कार्ला येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक होते.               समाजातील जाती व्यवस्था कायम संपल्या शीवाय माणूस माणसाशी समतेने वागणार नाही अशी खंत हि त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमास शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.      सदर कार्यक्रमास बार्टी पुणे च्या मुख्य संचालीका श्रीमती प्रज्ञा वाघमारे मॅडम आणि लातूर विभागाच्या सहाय्यक प्रकल्प संचालीका श्रीमती सुजाता पोहरे यांच्ये मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...