नांदेड जिल्ह्यातील या तालुक्यात गुटखा विक्रीचा खुलेआम भरला बाजार
हाॕटेल्स , पानठेले , किराणा दुकानातुन खुल्लमखुल्ला विक्री
ए जी कुरेशी
बिलोली -( ता.प्र.) मागच्या दोन वर्षाअगोदर बंद झालेला आणि कायद्याने बंदी आणलेल्या गुटखा विक्रीला कायद्याचे भय राहीले नाही . कार्यवाहीचा कठोर बडग्याची भितीच नसल्याने बिलोली तालुक्यात गुटख्याची चोरुन नाही तर सर्रास पणे खुलेआम विक्री करण्यात येत आहे.
महाराष्ट्र शासनाने मागे गुटखा , खर्रा विक्रीवर बंदी आणली .कायद्याच्या वाटा पळवाटा शोधुन कायद्याला कुचकामी ठरवण्याचा प्रयत्न केला जातो.ज्या हेतुने असे निर्णय होतात माञ त्या हेतुलाच हरताळ फासण्यात येते.असेच गुटख्याच्या बाबतीत बिलोली तालुक्यातले चिञ आहे. शेजारच्या तेलंगणा राज्यात हा गुटखा चालु आहे .तेलंगणा आणि बिलोली शहरापर्यंत चे अवघे 12 किलो मिटर इतके अंतर आहे. त्यामुळे तेलंगणातील गुटख्याच्या मोठ्या व्यापा-यांचे डोळे बिलोली तालुक्याकडे वळले आहेत.मोठ्या वाहनांद्वारे गुटख्याने भरलेल्या गाड्या बिलोली तालुक्यात खाली करण्यात येतात.लाखो रुपयांचा गुटख्याचा मोठा साठा केला जातो.हाच गुटखा सगरोळी , केसराळी , बडुर , आदमपुर अशा ठिकाणी किराणा दुकान ,हाॕटेल , पानटप-यावर पुरवठा केल्या जात आहे.गुटखाबंदी असतांना बिलोली तालुक्यात माञ गुटख्याची खुल्लमखुल्ला विक्री करण्यात येत आहे.यामुळे आरोग्याचा प्रश्न आहेच त्याचबरोबर प्रशासनाकडुन न होणा-या कार्यवाहीचेही नवल वाटते.या गुटखा विक्री करणा-या तेलंगणाच्या व्यापा-यांचा बंदोबस्त करण्यात यावा जेणेकरुन बिलोली तालुक्यात गुटखा विक्रीला आळा बसेल अशी चर्चा सध्या बिलोली तालुक्यात होत आहे.

No comments:
Post a Comment