: परभणीत किरकोळ कारणावरुन शिवसेना नगरसेवकाची हत्या
परभणी येथे किरकोळ कारणावरूनशिवसेना नगरसेवकाची हत्या
झाल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे. अमरदीप रोडे असं हत्या झालेल्या नगरसेवकाचं नाव आहे. परभणीतील जायकवाडी वसाहत परिसरातील या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. घटनेतील दोन आरोपी स्वत: पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
अमरदीप यांच्यावर किरकोळ वादातून त्यांच्याच दोन सहकाऱ्यांनी हल्ला केला. रविवारी सकाळची ही घटना आहे. रवी गायकवाड आणि किरण ढाके अशी आरोपींची नावं आहेत. अमरदीप यांची हत्या केल्यानंतर आरोपी रवी गायकवाड आणि किरण ढाके हे थेट पोलीस स्टेशनला हजर झाले. हत्येचं नेमंक कारण अद्याप समोर आलेलं नसून पोलीस अधिक तपास करत आहेत.
अमरदीप यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आला आहे. घटनेनंतर परिसरात मोठा जमाव जमला होता शहरात तणावाचं वातावरण निर्माण झाले होते अत्ता तणावपूर्ण शांत वातावरण आहे

No comments:
Post a Comment