Saturday, March 16, 2019

सामाजिक कार्यकर्ते माधव मेकेवाड यांची रिपब्लिकन सेनेच्या जिल्हा संघटक व प्रसिद्धी प्रमुख पदी निवड

सामाजिक कार्यकर्ते माधव मेकेवाड यांची रिपब्लिकन सेनेच्या जिल्हा संघटक व प्रसिद्धी प्रमुख पदी निवड




नांदेड:- (प्रतिनिधी)
तरुण मनांच्या न्याय हक्कांसाठी लढणारी रिपब्लिकन सेना नांदेड जिल्हात रिक्त पद काहींना सक्रिय कार्यकर्त्यास देण्यात आले बहुजन नेते
इंदू मिल चे प्रणेते सर सेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली चालणारी रिपब्लिकन सेना यांच्या या सामाजिक सेने मध्ये  नांदेड जिल्हा संघटक म्हणून माधव नरसिंग मेकेवाड यांची  माधव दादा जमदाडे ,अनिल शिरसे यांनी आज रोजी निवड नियुक्ती पत्र देऊन केली ही निवड प्रक्रिया नांदेड येथे पार पडली यावेळी अनेक जण उपस्थित होते पोलीस टाइम्स चे बेग,डी डी वाघमारे,महिला आघाडी जिल्हाअध्यक्षा गौतमी कावळे,सचिव संजय निळेकर, संतोष साळवे(युवा जिल्हा अध्यक्ष),एस आर नवले यांच्या सह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती
रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या या रिपब्लिकन सेनेची माहिती सविस्तर असे की,राजकीय आरक्षणाचा समाजाला काहीच फायदा होत नाही. मागासवर्गीय समाजासाठी राजकीय आरक्षणे असूनही निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींकडून समाजाचे प्रश्न सभागृहात मांडले जात नाहीत, त्यामुळे देशातील राजकीय आरक्षण बंद करण्यात यावे', अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर एकमेव यांनीच केली होती.देशातील अनुसुचित जाती-जमाती, ओबीसी आणि अन्य मागासवर्गीय समाजासाठी राजकीय आरक्षणाची घटनेत तरतूद आहे. ज्या समाजासाठी राजकीय आरक्षणे देण्यात आली आहेत. त्या समाजातील निवडून आलेली व्यक्ती समाजाचे प्रश्न सभागृहात मांडत नाहीत. लोकप्रतिनिधी हे पक्षाच्या भूमिकेला बांधिल असतात. ते समाजापेक्षा पक्षाची भूमिका मांडत असल्याने त्याचा समाजाला काहीच फायदा होत नाही. हीच भूमिका डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ही मांडली होती, असे आनंदराज आंबेडकर भाषणा वेळी बोलून दाखवतात म्हणून बाबासाहेबांचे आंबेडकरी वादळ घेऊन आनंदराज आंबेडकर चर्चेत आले आहेत त्यांची रिपब्लिकन सेना आज रोजी भरभक्कम कार्यकर्ते जोडून वंचित बहुजनांना एकत्र करण्याचं काम जोमाने सुरू आहे नांदेड येथे मराठवाडा अध्यक्ष माधवदादा जमदाडे (रिपब्लिकन सेनेचे ,मराठवाडा अध्यक्ष) या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष अनिल शिरसे यांनी अनेक कार्यकर्ते जोडले आहे.

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...