Monday, March 11, 2019

सर्व मानवजातीचा ईश्वर एकच आहे :अमजद खान

सर्व मानवजातीचा  ईश्वर एकच आहे :अमजद खान


बिलोली:(ए जी कुरेशी):
सर्व मानव जातीचा ईश्वर एकच आहे असे विचार नांदेड़चे प्रसिद्ध वक्ते अमजद खान यांनी बिलोली येथील आयोजीत इस्लाम परिचय मेळाव्यात व्यक्त केले.

दि.१० मार्च रोज रविवारी बिलोली येथील शौकत फंक्शन हॉल येथे आयोजीत "इस्लाम परिचय" मेळाव्यात बोलताना पुढे म्हणाले  की मोहम्मद सल्ल.(अलै.)हे इस्लाम धर्माचे संस्थापक नसून शेवटचे प्रेषित होते पवित्र  कुरआन हे फक्त मुस्लिम समाजाचे ग्रंथ नसून जगाचे सर्व मानव जातीसाठी ईश्वराने निर्मिति केली आहे.पवित्र कुरान असे सांगतो की प्रत्येकाचा मृत्यु हे अटळ आहे मृत्यु नंतर अजुन एक जीवन आहे त्या जीवना मध्ये चागले व वाइट कर्म तपासले जाईल चागले कर्म करणारा स्वर्गात जाईल व वाइट कर्म करणारे हे नरक  मध्ये जाईल असे अमजद खान यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष  स्थानी  बिलोली न. प.माजी  अध्यक्ष यादवराव तुड़मे,वैद्यकीय अधीक्षक डॉ. नागेश लखमावार,पोलीस निरीक्षक भगवान धबगड़े,लक्ष्मराव जाधव गुरुजी,माधव जाधव तलाठी आदि मान्यवराची उपस्थित होती.
कार्यक्रमाची सुरूवात हाफीज  जफर यांनी पवित्र कुरआन मधील आयताचे पठन केले यावेळी डॉ. सलाउद्दीन नादेड़कर पोलीस निरीक्षक भगवान धबगड़े यांनी आपले विचार मांडले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्ताविक शकील अहेमद यांनी केले तर आभार शेख फारुख अहेमद यांनी  मांडले या कार्यक्रमात सर्व जाती धर्माचे लोक उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एजाज फारुखी,मौलाना अहेमद बेग ईनामदार,ए. जी.क़ुरैशी,शेख फारुख अहेमद,मुकर्रम फारुखी,शौकत बेग ईनामदार,शेख मुस्ताक,शेख वाजिद आदिनी केले.

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...