Monday, March 4, 2019

२० वर्षाच्या प्रतिक्षे नंतर 'हम दिल दे चुके सनम 2’ ऐश्वर्या राय बनणार का सलमान खानची हिरोईन?

२० वर्षाच्या प्रतिक्षे नंतर 'हम दिल दे चुके सनम 2’ ऐश्वर्या राय बनणार का सलमान खानची हिरोईन?


बेधडक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
‘हम दिल दे चुके सनम 2’ बद्दल आणखी एक मोठी बातमी आहे. होय, चर्चा खरी मानाल तर या चित्रपटात सलमानच्या अपोझिट ऐश्वर्या राय हिला घेण्याची भन्साळींची इच्छा आहे.

सन १९९९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हम दिल दे चुके सनम’ने बॉक्स आॅफिसवर प्रचंड धूम केली. या चित्रपटानंतर सलमान खानला संजय लीला भन्साळींच्या चित्रपटात पाहण्यासाठी चाहते आसूसले. २० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर गोड बातमी आली आणि ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटाच्याच सीक्वलमध्ये सलमानची वर्णी लागली. आता ‘हम दिल दे चुके सनम 2’ बद्दल आणखी एक मोठी बातमी आहे. होय, चर्चा खरी मानाल तर या चित्रपटात सलमानच्या अपोझिट ऐश्वर्या राय हिला घेण्याची भन्साळींची इच्छा आहे. केवळ इतकेच नाही तर, लवकरच भन्साळी ही आॅफर घेऊन ऐश्वर्याला भेटणार असल्याचेही कळतेय.
खरे तर भन्साळींनी याआधीही सलमान-ऐश्वर्याला आॅनस्क्रीन एकत्र आणण्याचे प्रयत्न केले होते. होय, ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटात भन्साळींना सलमान व ऐश्वर्या या जोडीला कास्ट करायचे होते. पण ऐश्वर्याने ही आॅफर त्यावेळी धुडकावून लावली होती. ऐश्वर्याने नकार दिल्यानंतर सलमानही या प्रोजेक्टमधून बाहेर झाला होता. यानंतर भन्साळींनी रणवीर सिंग व दीपिका पादुकोण यांना पसंती दिली होती. आता पुन्हा एकदा भन्साळी सलमान व ऐश्वर्याला आॅनस्क्रीन एकत्र आणू इच्छित आहेत. सध्या ऐश्वर्यालाही एका दमदार चित्रपटाची गरज आहे. अशात ऐश्वर्या भन्साळींची ही आॅफर स्वीकारते की नाही, हे पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे. ‘हम दिल दे चुके सनम’च्या सेटवरचं सलमान व ऐश्वर्याची लव्हस्टोरी बहरली होती. पण कालांतराने दोघांचेही ब्रेकअप झाले आणि तेव्हापासून ऐश्वर्या कायम सलमानला टाळताना दिसली.

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...