Tuesday, March 5, 2019

अमन आरोग्य सवलत कार्ड चे उपविभागीय अधिकाऱ्यांकडून कौतुक

अमन आरोग्य सवलत कार्ड चे उपविभागीय अधिकाऱ्यांकडून कौतुक



आरोग्य सेवेसाठी संस्थेला आवश्यक मदतीसाठी सदैव तत्पर असल्याची दिली ग्वाही

वसमत (प्रतिनिधी)
डॉक्टर्स वसमत यांच्या सहकार्याने अमन सेवाभावी संस्थे मार्फत गरजू रुग्णांसाठी बनवण्यात आलेल्या आरोग्य सवलत कार्ड चे उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी यांनी कौतुक केले आहे

 वसमत तालुक्यातील गोरगरीब गरजू रुग्णांसाठी अमन सेवाभावी संस्थेमार्फत शहर पेठ येथे  अमन आरोग्यसेवा मदत केंद्र उभारण्यात आले असून या ठिकाणी गरजूंना आरोग्य साहित्य व मोफत औषध पुरवठा केला जात आहे

यात भर म्हणजे वसमत येथील 17 डॉक्टर्स यांच्या मदतीने संस्थेमार्फत आरोग्य सवलत कार्ड बनवण्यात आले असून रुग्णांना ओपीडीमध्ये 30% तर आयपीडी मध्ये 20 टक्के सौलत सदर रुग्णालयात देण्यात येत आहे

संस्थेचे अध्यक्ष फेरोज पठाण यांनी सोमवारी तालुका टास्कफोर्स समिती चे अध्यक्ष तथा उपविभागीय अधिकारी वसमत श्री प्रवीण फुलारी यांची भेट घेऊन कार्ड भेट देऊन माहिती दिली असता त्यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले तसेच गरजू रुग्णांना याचा चांगला फायदा होणार असुन त्यांची आर्थिक बचत होणार आहे भविष्यात संस्थेला आवश्यक ती मदत करण्यास आपन सदैव तत्पर असल्याची ग्वाही त्यांनी या वेळी दिली

तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुनिल देशमुख यांची उपस्थिति होती

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...