कासराळी च्या सरपंच सौ.हायगले वर अविश्वास ठराव पारीत -
बिलोली प्रतिनिधी :(ए जी कुरेशी)
कासराळी चे सरपंच सौ.ललिता संग्राम हायगले यांच्या वर बुधवारी दहा ग्राम पंचायत सदस्यानी अविश्वास ठराव पारीत केला आहे,शुक्रवारी सौ.हायगले वर अविश्वास दाखल करण्यात आला होता.
तालुक्यातील मोठी ग्राप पंचायत म्हणून ओळख असलेल्या कासराळी ग्रा.प.चा कारभार लक्ष्मणराव ठक्करवाड यांनी माजी जि.प.सदस्य संग्राम हायगले यांच्या पत्नी ललिता हायगले यांना सरपंच पद बहाल केले होते.पंरतु सरपंचाचे पती संग्राम हायगले यांचा ग्रा.प.मध्ये मोठ्या प्रमाणात ढवळा ढवळ सुरु केल्याने या दोन नेत्यात बिनसले होते.म्हणून शुक्रवारी सात ग्रा.प.सदस्यानी सरपंचा वर अविश्वास आनला होता, सरपंच सौ.हायगले वर बि.आ.जि.एफ.मध्ये,पाणी प्लेन्ट मध्ये, भ्रष्टाचार केल्याचे व सदस्यांना विश्वासात न घेणे,गावात स्वच्छता न ठेवने,घरपट्टी वसुल न करणे आदीचा ठपका ठेवण्यात आला होता.तहसिल प्रशासना कडुन दिनांक १३ मार्च ची तारीख पारीत करण्यासाठी दिली त्या नुसार दहा सदस्य हे एका बाजुने राहुन पारित केले तर सरपंचाच्या बाजुने सरपंच ही हजर राहीले नाहीत या मुळे सरपंच सौ.ललिता हायगले हे पायउतार व्हावे लागले.तर काँग्रेस चे दोन सदस्य हे तटस्थ राहीले,निवडणुक अधिकारी म्हणून नायब तहसिलदार संजय नागमवाड हे काम पाहीले.हा अविश्वास पारीत करण्यासाठी माजी सरपंच अरविंद ठक्करवाड,उपसरपंच शेषराव लंके यांनी महत्त्वाची भुमिका राहीली आहे,ठराव पारीत होताच ठक्करवाड समर्थकामध्ये जल्लोश करण्यात आला.

No comments:
Post a Comment