Saturday, March 2, 2019

विजेचे खांब व विद्युत तारा झुकल्याने धोका. महावितरण विभागाचे भोंगळे मणमानी कारभार

विजेचे खांब व विद्युत तारा झुकल्याने धोका. महावितरण विभागाचे भोंगळे मणमानी कारभार


 विजेचे खांब पूर्णतः झुकल्याने खांबामध्ये  विद्युत प्रवाह उतरण्याची दाट शक्यता



बिलोली प्रतिनिधी ए .जी. कुरेशी
मौजे अटकळी (ता.बिलोली)  येथे  विजेच्या तारा लोखंडी पोलला स्पर्श होत असल्यामुळे नागरिक तथा मुक्या प्राण्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला असून संबधित अधिकारी व लाईनमन यांचे  दुर्लक्ष करीत असल्याने भविष्यात भयंकर दुर्घटना  घडण्याची शक्यता आहे.. दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण? असा सवाल गावातील नागरिक करीतआहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नांदेड -देगलूर मुख्य रस्त्यावरील अटकळी (ता.बिलोली) येथे विज वितरण कंपनीचे विद्युत वाहिनीचे पोल आहेत. हे पोल झुकल्याने यावरील ताराही  झुकल्या आहेत. तसेच  ह्या तारा पोलला स्पर्श होऊन विद्युत प्रवाह यामध्ये प्रवाहीत होण्याची दाट शक्यता आहे. विद्युत खांब अगदी मुख्य रस्त्याच्या बाजूला असल्याने  माणसे, जनावरे, बैलगाडी, शाळेतील लहान मुले व आबालवृद्धांना धोका निर्माण झाला आहे. या रस्त्यावर    मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्याने दुखापत अथवा गंभीर दुर्घटना घडण्याची दाट शक्यता असून जिवावर बेतन्याची वेळ आली आहे. तर याला जबाबदार कोण? असा प्रश्न येथील नागरिकांना पडत आहे. अटकळी गावातील नागरिकांनी यासंदर्भात लाईनमन व विद्युत  वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून सुद्धा संबंधितअधिकारी व कर्मचारी याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहेत याबाबत  तात्काळ दखल घेऊन दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. स्थानिक लाईमनला गावक-यांनी विनंती करुनही या गंभीर बाबीची  दखल घेतली नसल्याचे अटकळीतील प्रतिष्ठित नागरिकांनी सांगितले आहे.

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...