Sunday, March 24, 2019

स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांची कन्या खा.डॉ.प्रितमताई मुंडेंचा महायुतीच्या अधिकृत लोकसभा उमेदवार म्हणून अर्ज दाखल करण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित रहा―ऋषिकेश विघ्ने

स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांची कन्या खा.डॉ.प्रितमताई मुंडेंचा महायुतीच्या अधिकृत लोकसभा उमेदवार म्हणून अर्ज दाखल करण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित रहा―ऋषिकेश विघ्ने



पाटोदा (प्रतिनिधी):
बीड लोकसभा मतदारसंघातील 'भाजपा-शिवसेना-रासपा-रिपाई' महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ.प्रितमताई गोपीनाथ मुंडे उमेदवारी अर्ज भरणार असुन त्यांना आशिर्वाद देण्यासाठी आणि पुन्हा एकदा बीड जिल्ह्याच्या राजकिय नकाशावर विजयाची गुढी उभारण्यासाठी जिल्ह्यातील तमाम कार्यकर्ता बंधु आणि जनतेने बीडला यावे असे आवाहन भाजपाचे ऋषिकेश विघ्ने यांनी केले आहे.
बीड जिल्ह्यातील जनतेने लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेबांवर भरभरून प्रेम केलं आहे. त्याचप्रमाणे पंकजाताई मुंडे व डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या पाठिशी उभा राहून सतत आशीर्वाद या बीड जिल्ह्यातील जनतेनं दिलेले आहेत.
ना.पंकजाताई व खा.डॉ.प्रितमताईंनी बीड जिल्ह्यात विकासाची गंगा आणली.सर्वदूर विकास केला.सर्वसामान्य माणूस सत्तेचा केंद्रबिंदू मानून त्यांच्यासाठी सत्तेचा उपयोग या मुंडे भगिनींकडून केला गेला.रेल्वे,रस्तेविकास करून दळणवळणाच्या सोयी जिल्ह्यासाठी उपलब्ध करून दिल्या व विविध क्षेत्रात जिल्हा प्रगतीवर नेला.
दि.२५ मार्च रोजी दुपारी २ वाजता बीड जिल्ह्याच्या विद्यमान खासदार डॉ.प्रितमताई गोपीनाथजी मुंडे यांचा महायुतीच्या अधिकृत उमेदवार म्हणून लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे.बीड जिल्ह्याचा अधिक विकास करण्यासाठी व सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र झटणाऱ्या या नेतृत्वाचा अर्ज दाखल करण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित राहून खा.डॉ.प्रितमताईंच्या विजयावर शिक्कामोर्तब करावे असे आवाहन पाटोदा भारतीय जनता पार्टीचे ऋषिकेश विघ्ने यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...