Wednesday, March 20, 2019

माणुसकी अजून संपलेली नाही बिलोली तालुक्यातील अर्जापुर येथील शाळेचा आगळा वेगळा उपकृम.

माणुसकी अजून संपलेली नाही बिलोली तालुक्यातील अर्जापुर येथील शाळेचा आगळा वेगळा उपकृम.




बिलोली प्रतिनिधी (ए जी कुरेशी)
 शाळा हे संस्काराचे केंद्र आहे. यातून देशाची पिढी घडत असते. चिमूकल्यांना जसे घडविले तसे ते घडत असतात. निव्वळ पुस्तकी ज्ञान देणे म्हणजे शिक्षण नव्हे. पुस्तकी ज्ञानासोबतच नैतिक मूल्ये विद्यार्थ्यांच्या अंगी रुजविण्यासाठी काही सामाजिक उपक्रम शाळेत राबविले जातात. गत महिन्यातच *अंध निधीचे संकलन करण्यात आले* व ती रक्कम नाशिक येथील कार्यालयाला सर्वप्रथम आमच्या शाळेने पाठविले. 
किरण व कोमल नेहमीप्रमाणे शाळेला आलेत.पण शाळेचा गणवेश घातला नसल्याने विचारण्यात आले. तेव्हा जे कळाले ते खूपच ह्रदयद्रावक होते. ती घटना म्हणजे,
 *अर्जापूर येथील श्रीमती शांताबाई केशव कांबळे* यांच्या घराला आग लागली व त्या आगीत त्याचे घर जळून खाक झाले असे त्यांच्या मुलांकडून कळाले. ही माहिती  विद्यार्थ्यांना सांगितली व मदतीसाठी आव्हान करण्यात आले. सर्व विद्यार्थी व शिक्षकांच्या मदतीने, आज होळीच्या सणाला त्यांना सण साजरा करता यावं या उद्देशाने १७०१/ रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. विशेष म्हणजे इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी, सातवीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यासाठी काही पैसे जमा केले होते. ती रक्कम खर्च न करता मदत निधीसाठी जमा केले. या साठी शाळेतील शिक्षक श्री नवाथे सर, श्रीमती गायकवाड मॅडम, सौ.खिसे मॅडम, सौ.सोमपूरे मॅडम, श्री साजिद सर, सौ.जाधव मॅडम व शाळेचे मुख्याध्यापक श्री गेंदेवाड सर इत्यादींनी प्रयत्न केले.

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...