Friday, March 1, 2019

बिलोलीत सार्वजनिक शिवजन्मोत्सव उत्साहात साजरी..

बिलोलीत सार्वजनिक शिवजन्मोत्सव उत्साहात साजरी..




बिलोली(  ए.जी.कुरैशी)
आज दि.१ मार्च रोजी तिथी प्रमाणे  सार्वजनिक  रित्या  शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
सकाळी ११वाजता  शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या समोर शिवरायाचा ध्वजारोहण कार्यक्रम घेण्यात आला.
 विरमाता  ईन्दीराबाई सुर्यवन्शी यान्च्या हस्ते ध्वजारोहण केले.
त्यानंतर  शिवाजी महाराज पुतळ्याची पुजा करुन पुतळ्यास अनेक मान्यवरानी पुष्पहार अर्पण करुन  अभिवादन करण्यात आले.
यावेळी तहसिलदार तालूका दन्डाधिकारी विक्रम राजपुत,  नायब तहसिलदार  ओमप्रकाश गौन्ड ,संजय नागमवाड , जि.प..सदस्य लक्षमण  ठक्करवाड,  सभाजी बिर्गेड चे जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील, तालूका काँग्रेस अध्यक्ष शिवाजिराव पाटील, आल्पसन्ख्याक सेल चे ता.अध्यक्ष शेख सुलेमान सेठ , श्नीनिवास पटेल,  हाणंमत पाटील नागापुरकर,  चक्रधर पाटील,  प्रविण पाटील , छावाचे साहेबराव शिन्दे, बाबाराव रोकडे पाटील,  राजु पाटील शिन्दे  साई अरगुलवार वलीयोदिन फारुखी असे विविध पक्षाचे   कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी विरमाता ईन्दीराबाई सुर्यवंशी यान्चे  तहसिलदार राजपुत यानी शाल श्नीफळ व पुष्पहाराने  सत्कार केले.
सांंयकाळी  ५.३० वाजता  बागेतील मन्दीर पासुन शहराच्या मुख्यमार्गाने  ढोल ताशा वाजत  फटाके फोडुन रैली  काढण्यात आली. शिवाजी पुतळा येथे रैली थांबवण्यात आली.

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...