दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी बैतुल माल कमेटी कडून १४ जोडप्याचे विवाह सोहळा संपन्न
भोकर (एजास कुरेशी)
दर वर्षी प्रमाणे बैतुल माल कमेटी यांच्या कडून भोकर शहरात दरवर्षी गोरगरिबांचे मोफत विवाह करण्यात येतात त्यांच्या कडून कुठल्याही प्रकारचे पैसे न आकारता कमिटीचे अध्यक्ष शेख लतीफ खैराती यांच्या नेतृत्वाखाली अनेक जणांचे विवाह सोहळा नोंद करतात.
व त्या विवाह सोहळ्यास भोकर तालुक्यातील लोक राजकीय पुढारी जेष्ठ नागरीक,व पत्रकार बंधू , उपस्थित राहून त्या विवाहबद्ध जोडप्यास शुभ आशिर्वाद देण्यासाठी गर्दी करतात ही आलोट गर्दी पाहून सर्वच लोक अगदी मनसोक्त पणे आपली कार्य कर्तव्य मदत ह्या कार्यक्रमात करत असतात व तसेच बैतुल माल कमेटी भोकर कडून पलंग ,गादि , कपाट,विवाह उपयोगी सर्व साहित्य विवाह बध्द झालेल्या जोडप्यास संप्रेम भेट म्हणून देण्यात आले.
त्याच बरोबर आलेल्या सर्व पाहुण्यांचे बैतुल माल कमेटी अंतर्गत सुपर गार्डन येथे विवाह मंडपाच्या मध्ये जेवणासाठी मोठया प्रमाणात सोय देखील या वेळी करण्यात आली या वेळी या कार्यक्रमात वंचीत बहुजन आघाडीचे लोकसभा उमेदवार प्रा.यशपाल भिंगे व एम आय एम चे मराठवाडा अध्यक्ष फिरोज लाला भोकर पोलीस निरीक्षक विकास पाटील व तसेच सर्व पक्षातील कार्यकर्ते , पदअधिकारी, या कार्यक्रमात आपली हजेरी लावली.
बैतुल माल कमेटी कडून सर्व मान्यवरांचे स्वागत पुष्पगुछ देऊन करण्यात आले अनेक लोकांनी शुभ आशीर्वाद देऊन त्या वेळी अनेक जणांच्या भेटी घेतलेले दिसून आले व तसेच या विवाह सोहळ्यामध्ये ५००० लोक उपस्थित होते असे बैतुल माल कमेटी चे अध्यक्ष शेख लतीफ खैराती यांनी सांगितले .

No comments:
Post a Comment