Sunday, March 31, 2019

ग्रंथालये दुर्बल झाली तर देशाला भवितव्य नाही----देविदास फुलारी.

ग्रंथालये दुर्बल   झाली तर देशाला  भवितव्य नाही----देविदास फुलारी.



बिलोली. (ता.प्र)ग्रंथालये  वाचकांना निरनिराळे ग्रंथ  ऊपल्ब्ध  करुन देतात.  वाचकांची मानसिकता तयार करण्याचे कार्य ग्रंथपाल करतात. ग्रंथालयाकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. ग्रंथालये  दुर्बल झाली तर  देशाला भवितव्य नाही. असे मत प्रसिध्द साहीत्यीक  देविदास फुलारी यांनी व्यक्त केले.

ते बिलोली  येथे 30 मार्च रोजी जनक्रांती वाचनालायात आयोजीत  जिल्हा ग्रंथालय  सम्मेलनांत बोलत होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हाअध्यक्ष माजी आमदार  गंगाधर पटने होते. तर प्रमुख अतिथी म्हणुन निवृत्त  सहायक ग्रंथालय संचालक रा. श. बालेकर  जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशीश ढोक   प्रकाशक निर्मलकुमार सुर्यवशी अॕड. डि.एम. कुंचेलीकर  निरीक्षक प्रताप सुर्यवंशी आदि उपस्थीत होते.

साहीत्यीक फुलारी पुढे म्हाणाले की  पुस्तके संस्कृतीचे  मस्तक आहेत. ग्रंथालयाचे अडचणी अनेक आहेत. तरी पण  वाचकाला त्याचे आवडीचे पुस्तक ग्रंथालायात मिळतात. हे कमी नाही.
कराडच्या प्रीतीसगंमावर रवींद्र कामत यानी केलेल्या उपोषणाला शुभेच्छा दिल्या. ग्रंथालय चालकाना शासनाकडुन  न्याय मिळाला पाहीजे असे सांगीतले.
ते पुढे म्हणाले की मराठी वाडंमय आले. दलीत साहीत्य आले. मुस्लीम साहित्य आले. परंतु बाल साहीत्याकडे दुर्लक्ष झाले. बाल  साहीत्य   मोठ्या प्रमाणात उपल्ब्ध  करून  देण्याची गरज असल्याचे साँगीतले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण  गंगाधरराव पटने यानी केले.  ते म्हणाले की ग्रंथालया बाबत शासनाचा दृष्टिकोन नकारात्मक आहे. शासना कडे ग्रंथालयाच्या विवीध मागण्या व कर्मचारी वेतनश्रेणी, बाबत असंख्य निवेदने उपोषण आंदोलने करण्यात आली. परंतु   राज्य सरकार ने आश्वासना शिवाय काहीच दिले नाही. साडेचार वर्षात कुंभकर्णी  सरकारने एक रुपयाचे अनुदान वाढ केले नाही.
ग्रंथालय कायदा १९६७ ला झाला . त्याला ५०  वर्ष झाली. कायद्यात सुधारणा करणेसाठी  समिती स्थापन करण्यात आली, केवळ सरकारने चालढकल केली.अशी  टिका केली.
गृथालयाचे कर्मचारी तुटपुन्ज्या वेतनात  ज्ञान दानाचे काम करतात. सरकार मात्र अंगणवाडी  गृहरक्षक दलाचे वेतन वाढविले.ग्रंथालय सेवकाचे वेतनाबाबत  दुर्लक्ष केल्याची खंत व्यक्त केली.
 गृबथालयाचेजनक डाॕ. एस.आर. रगँनाथन यांचा प्रतिमेस पुष्पहार व  दिपप्रज्वलन करुन करण्यात आली. व्यासपिठ वर उपस्थित मान्यवराचा शाल पुष्पहार व पुस्तक भेट देवुन करण्यात आली.
कार्यकृमाचे सुत्रसचालन लगडापुरे सर यानी केले तर आभार सुभाष पाटील यानी मानले. अधिवेशनास जिल्ह्यातिला शभर  चे वर प्रतिनिधी उपस्थित होते.




No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...