Thursday, March 28, 2019

लोकसभेला संधी दिल्यास भोकर तालुक्याचा चेहरा मोहरा बदलुन टाकु-- प्रतापराव पाटील चिखलीकर

लोकसभेला संधी दिल्यास भोकर तालुक्याचा चेहरा मोहरा बदलुन टाकु-- प्रतापराव पाटील चिखलीकर



बेधडक महाराष्ट्र न्युज नेटवर्क

(एजास कुरेशी)
नांदेड लोकसभा मतदारसंघात विकास करण्यासाठी व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी नांदेड लोकसभा मतदारसंघात मला संधी दिल्यास भोकर तालुक्याचा चेहरामोहरा बदलून टाकु व सामान्य शेतकरी बेरोजगार युवक यांच्या समस्या सोडण्यासाठी मी कटिबद्ध राहील असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे लोकसभा उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी  केले

भोकर तालुक्यातील सुरूगऋषी येथील पौराणिक मंदिरात  माजी मंत्री डॉक्टर माधवराव पाटील किन्हाळकर, प्रा सुनिल नेरळकर ,
नागनाथ घिसेवाड ,किशोर पाटील लगळुदकर,  सेनेचे माधव पावडे, जिल्हा परिषद सदस्य दिवाकर रेड्डी , दिलीप सोनटक्के  गणपत पिठ्ठेवाड
 देविदास राठोड, शिवाजी पाटील किन्हाकर , यांच्या प्रमुख उपस्थित
नारळ फोडून भारतीय जनता पार्टीचे लोकसभा उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला



यावेळी पुढे बोलताना चिखलीकर म्हणाले की भोकर तालुक्याच्या विकासासाठी खासदार अशोकराव चव्हाण यांनी काहीही केले नसून केवळ सामान्य जनतेचा आता पुरता वापर केला भोकर तालुक्यातील ग्रामीण भागात युवकांना आताही रोजगार उपलब्ध नाही येथील शेतकरी बांधवांना पिक विमा मेळावा यासाठी पत्नी आमदार स्वतः खासदार असून सुद्धा त्यांनी काहीही केले नाही भोकर शहराला पाणीपुरवठा करणारा एकमेव सुद्धा प्रकल्प यांची यांची उंची वाढविण्याचे आश्वासन गेल्या लोकसभा नंतर विधानसभा निवडणुकीमध्ये दिले होते ते आतापर्यंत पूर्ण केले नाही जर आम्ही तुमच्या आशीर्वादाने लोकसभेमध्ये गेलो तर सर्वात पहिले सुधा प्रकल्पाची उंची वाढण्याचे काम करू असे आश्वासन भारतीय जनता पार्टीचे नांदेड लोकसभा उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले
यावेळी   माजी मंत्री डॉक्टर माधव पाटील किन्हाळकर सुभाष पाटील किन्हाकर यांनी आपले विचार मांडले
 याप्रसंगी


गणेश पाटील कापसे     बाळासाहेब साकाळकर हरिभाऊ चाटलावार  प्रशात पोपशेटवार  राजेश करपे  सतीश देशमुख  धनराज पवार  संतोष मारकवार माधव वडगावकर राजु अंगरवार  प्रशांत कानडे  अर्शद अहेमद ईस्माईल मिस्त्री  राजू वाघमारे  निशाद ईनामदार  सहित
 परिसरातील मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...