सगरोळी प्राथमिक आरोग्य केंद्रावर कर्मचारी करत आहे रूग्णांची आरोग्य तपासणी१५ दिवसांपासुन वैद्यकिय अधिका-यांची अनुपस्थिती
रूग्णांसह नातेवाईकांचा संताप व्यक्त केला जात आहे
लोकप्रतिनिधी चे दुर्लक्ष
बिलोली प्रतिनिधी : (ए जी कुरेशी)
बिलोली तालुक्यातील सगरोळी येथे असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या पंधरा दिवसांपासुन वैद्यकीय अधिकारी येत नसल्यामुळे या आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांकडून रूग्णांची तपासणी केली जात आहे. या गंभीर घटनेचे रूग्णांसह नातेवाईकांकडून संताप व्यक्त केला जात असताना, ही बाब तालुका आरोग्य अधिका-यांना माहितीच नसल्याचे समजते, यामुळे या आरोग्य केंद्राच्या समस्येकडे लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.
बिलोली तालुक्यातील मोठे गाव आहे. याबरोबरच सगरोळी या गावात मोठी बाजारपेठे असल्याने परिसरातील व्यापाऱ्यांची नेहमीच येथे वर्दळ असते याची दखल घेऊन परिसारातील नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न सुटावेत या उद्देशाने सगरोळी येथे
ब-याच वर्षापुर्वी प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात आले. या आरोग्य केंद्राला वैद्यकीय अधिकारी गट अ व गट ब ही दोन्ही पदे मंजूर आहेत मात्र गेल्या काही दिवसांपासुन या आरोग्य केंद्रातील गट अ हे व गट ब ही दोन्ही पद रिक्त असल्याने या आरोग्य केंद्रातील कर्मचारी आरोग्य सहाय्यक कौशल्य हे रूग्णांची तपासणी करत आहेत. यामुळे या आरोग्य केंद्रात दोन दोन आरोग्य अधिकारी पद असताना एकही अधिकारी उपलब्ध असू नये ही शोकांतीकाच म्हणावी लागेल. या प्राथमिक आरोग्य केंद्रातील सदर बाबीची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वाडेकर यांना पत्रकारांनी भ्रमणध्वनी वरून विचारणा केली असता सदर बाबीची मला कुणीही कल्पना दिली नसल्याचे सांगितले. एकंदरीत सगरोळी प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकिय अधिकारी या पदाबरोबरच एमपीडब्ल्यु २ , कंपाउंडर १ , जीएनएम २ व सेवक १ आदी पदे रिक्त आहेत. या रिक्त पदामुळे आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांसह औषधांचा तुटवडा जाणवत असून रूग्णांची हेळसांड होत आहे, तरी स्थानिक लोकप्रतिनिधी नी व वरिष्ठांनी या बाबीचा गांभिर्याने विचार करून प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकिय अधिका-यांची तात्काळ नियुक्ती करावी व रूग्णांची होणारी हेळसांड थांबवावी अशी मागाणी तालुक्यातील गरीब जणता करत आहे.

No comments:
Post a Comment