Wednesday, March 13, 2019

या गावात साडेचार वर्षांपासून मतदानावर होता बहिष्कार आता लोकसभा निवडणुकीत होणार मतदान

या गावात साडेचार वर्षांपासून मतदानावर होता बहिष्कार आता लोकसभा निवडणुकीत होणार मतदान..




भोकर:-(एजास कुरेशी)
मौ. दिवशी बु., ता. भोकर येथील ग्रामस्थांचा निर्णय साडेचार वर्षांनंतर अत्ता होणार मतदान येथील मतदारांनी लोकसभा निवडणूक २०१९ करिता मतदान करावे याबाबत चर्चा व मार्गदर्शन पवन चांडक (सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, ८५-भोकर तथा उपविभागीय अधिकारी भोकर), सिद्धेश्वर भोरे (उपविभागीय पोलीस अधिकारी भोकर), भरत सूर्यवंशी (तहसीलदार भोकर),  एच. एम. गोपुलवाड (उपविभागीय जलसंधारण अधिकारी, भोकर),  विकास पाटील (पोलीस निरीक्षक भोकर), ग्रामपंचायतीचे प्रशासक श्री. कांबळे व इतर.ग्रामस्थामार्फत श्री. नरसय्या मेंडेवाड यांनी बाजू मांडली.
मौ. दिवशी (बु )इथे साडेचार वर्षांपासून मतदानावर बहिष्का।र होता.* मतदारांनी जिल्हापरिषद/ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान केलेले नव्हते. सदरील ग्रामपंचायतसाठी सरपंचाची निवड न झालेल्या प्रशासकीय अधिकारी नेमण्यात आले आहेत.बैठकी मध्ये प्रशासनातर्फे एच. एम. गोपुलवाड (उपविभागीय जलसंधारण अधिकारी, भोकर) यांनी सिंचन तलावाची मागणी मान्य झाल्याचे जाहीर केले. तसेच नाला खोलीकरण व रुंदीकरणचे काम, पांदण रस्त्याबाबतचे काम व तसेच बंधाऱ्यास ऑटोमॅटिक गेट बसविण्याचे कामाबाबत प्रशासकीय अधिकारी यांचेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला व तसेच  लोकसभा निवडणुक हा सर्वात मोठा राष्ट्रीय सण असल्यानेव उपस्थित वरिष्ठ अधिकारी आणि मौ. दिवशी बु. येथील मतदारांत सकारात्मक संवाद झाल्याने मतदारांनी एकमताने मतदानाचा हक्क बजाविण्याचे ठरविले आहे.

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...