Tuesday, May 7, 2019

आमदार राजासिंह, लच्छू पहेलवावर गुन्हा दाखल करा:- मिल्लत बचाओ तहेरिक

आमदार राजासिंह, व लच्छू पहेलवावर गुन्हा दाखल करा:-  मिल्लत बचाओ तहेरिक




 आ.राजासिंह,व लच्छू पहेलवावर गुन्हा दाखल करा मागणी : उपोषण सुरू

बेधडक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
हैदराबाद येथीलआमदार टी. राजासिंह, व लच्छू पहेलवान वर गुन्हा दाखल करण्यासाठी मिल्लत बचाओ तहेरिकने उपोषण सुरू केला आहे
 शिवसेनेचे खासदार यांच्या प्रचारात आयोजित जाहीर सभेत भाजपाचे हैदराबाद येथील आमदार टी.राजासिंह यांनी मुस्लिम धर्माच्या विरोधात भडकाऊ भाषण केले होते. आणि या सभेत लच्छू पहेलवानने खुलेआम तलवार हातात दिली होती. या दोघांनी भारतीय दंड संहिता 1860 ची विविध कलमांतर्गत व आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मिल्लत बचाओ तहेरिकने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. औरंगाबाद दंगलीतील आरोपी लच्छू पहेलवान यांनी या सभेत तलवार भेट दिली होती. राजासिंह यांनी आपल्या भाषणात मुस्लिम धर्माच्या भावना दुखतील असे या सभेत अनेकवेळा वक्तव्य केले आहे. पोलीस आयुक्त व जिल्हा प्रशासनाला तक्रार करुन सुध्दा अद्यापही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. तलवारीचा उपयोग केल्याने शाहगंज येथील दंगलीचा मुख्य आरोपी लच्छू पहेलवानला तडीपार करणे आवश्यक आहे. असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात मागणी केली आहे.
उपोषणाला मोहंमद इसा यासिन, नदीम राणा, मुनवर काझी, सादेक खान, शारेक आलम, एजाज खान, अब्दुल हाफिज जेडी, इस्माईल खान, सालेख बिन खालेद, शारेक अली बेग, मजहर मिर्झा, खलील खान, अहेमद सिद्दीकी, गणेश अण्णा, फहीम बाबा उपस्थित होते

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...