भोकर नगर पालीकेचा अजब कारभार :पाणी एक थेंब न देता बिल मात्र हजारो रुपयाचे !
आठ दिवसात पाणी पुरवठा न केल्यास आमरण उपोषण करण्याचा नागरिकांचा इशारा
भोकर : शहरातील नगर पालिकेच्या पाणीपुरवठा योजना जलशुद्धीकरण यंत्र वार्ड क्रमांक मधेच असूनही येथील शेख फरीद नगर, हनुमान नगर, बोरगाव रोड लगत लक्ष्मी नगर , जिल्हा परिषद हायस्कूल च्या पाठी माघील भागात जाणीवपूर्वक कृत्रिम तीव्र पाणी टंचाई ची समस्या निर्माण केली जात असून नगर परीषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडे पैसे भरून नळ जोडणी घेऊनही गेल्या चार-पाच वर्षापासून म्हणजेच नळ जोडणी घेतल्या पासून नळाला एक थेंबही पाणी येत नसल्याने येथील नागरिकांनी नगर पालिका व येथील माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक यांच्या विरोधात रोष व्यक्त केला आहे.
शहरात नगर पालिकेने पाणी पुरवठ्याच्यासाठी मोठ मोठी पाईप लाईन सर्वत्र टाकली पण शहरातीलच माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवकाचा वार्ड म्हणजे वार्ड क्रमांक ४ मधील जिल्हा परिषद हायस्कूल च्या पाठिमाघील भाग शेख फरीद नगर या वस्तीत काही भागात ही पाईप लाईन गेली तर काही भागात गेलीच नाही आणि ज्या भागात गेली तिथे अजूनही पाणी पोहचले येथील नागरिकांनी नळ जोडणी साठी रितसर तिन हजार सातशे रुपये भरून नळ जोडणी घेतली.नळ जोडणी घेऊनही चार ते पाच होऊन गेली आजवर यांच्या नळाला एक थेंबही सुद्धा पाणी आले नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. येथील नागरिकांचे म्हणने आहे की,आम्ही अनेक वेळा विनंती तक्रार येथील माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगर सेवक साहेबराव सोमेवाड यांच्याकडे केली असता यांनीही या बाबतीत कसलीच दखल घेतली नाही, नगर परिषदेकडे अनेक लेखी अर्ज केलोत तरी आमच्या मागणी कडे कोणीच लक्ष देण्यास तयार नाहीत व नळ पट्टी मात्र वेळेवर येते.नळाला एक थेंबही पाणी येता पाणी पट्टी मात्र आठ-आठ हजार रुपए येत आहे हे मात्र आश्चर्याची बाब आहे. आम्ही नळ जोडणी साठी हजारो रुपये भरुणही पाणी मिळत नाही आणि वरून पाणी पट्टी च्या नावाखाली हजारो रुपयाची लूट करण्यात येत आहे.पाण्यासाठी वार्डातील महिलांना-लेकरांना भर उन्हात, रात्रीबेरात्री एक-दोन किलो मीटर दूर वनवन भटकावे लागतं आहे.सद्या शहराला दोन दिवसा आड पाणी पुरवठा केला जात आहे आमच्या नळाला दोन वर्षे आड तरी पाणी पुरवठा करा अशा संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त करीत वरिष्ठांनी आमच्या मागणीकडे लक्ष देवून येत्या आठ दिवसात आमच्या नळाला पाणी पुरवठा न झाल्यास व मागील पाणी पट्टी माफ न केल्यास आठ दिवसा नंतर आपल्या कार्यालया समोर लोकशाही मार्गाने वार्ड क्रमांक ४ मधील सर्व महिला-पुरुष यांच्या वतीने आमरण उपोषण करण्याचा इशारा येथील स्थानिक नागरिकांनी दिला. पाणी न देता पाणी पट्टी मात्र वेळेवर जाते आणि सक्तीने वसूल केली जाते. यावरून भोकर नगर पालिकेच्या पाणीपुरवठा जलशुद्धीकरण योजनाच्या नावाने नागरिकांची अर्थिक लूट होत आहे व फसवी व कुचकामी ठरत आहे की काय असं भोकर येथील नागरिकांना वाटत आहे.
आमच्या वसाहतीत भोकर नगर पालिकेकडून घेतलेल्या नळाला आमच्यासह अनेक घरातील नाळाला नळ जोडणी घेतली तेव्हापासून पाणी येतच नाही. पाण्यासाठी भर उन्हात शाळेतील लेकरांनासुद्धा घेऊन बाहेर भटकावे लागत आहे.आम्ही अनेक वेळा येथील नगर सेवक साहेबराव सोमेवाड यांच्याकडे आमच्या नळाला पाणी येत नसल्याचे अनेकवेळा सांगितले पण हे म्हणतात मी काय करू शकतो हे माझे कामं नाही असे म्हणून माघील चार वर्षापासून उडवाउडवी ची उत्तरे देत आहेत. मी घरी नळ घेऊन चार वर्षे झाली तरी मागील चार वर्षात नाळाला एक थेंबही पाणी आले नाही पाणी पट्टी बिल मात्र वेळेवर येते.शहरात दोन दिवस आड पाणी पुरवठा होतो पण माझ्या घरी चार वर्षात एकदाही पाणी आले नाही अशी संतप्त प्रतिक्रिया नगर पालिकेविरुध्द आणि येथील नगर सेवका बद्दल व्यक्त करीत आहेत.पाणी न देता भरमसाट दिलेले माघील पाणी बिल माफ करून,येत्या आठ दिवसात नाळाला पाणी पुरवठा झाल्यास मी कुटुंबासह आपल्या कार्यालया समोर आमरण उपोषण करेल असा इशाराही यावेळी दिला.
- जयश्री टिकेकर

No comments:
Post a Comment