Monday, May 13, 2019

रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी मांजरम येथील आगीत जळून खाक झालेल्या आखड्याला भेट दिली*

रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी मांजरम येथील आगीत जळून खाक झालेल्या आखड्याला भेट दिली



दि.१३/०५/१९.
     नायगाव तालुक्यातील मांजरम येथील शेतकरी अशोक जांभळे यांच्या पशु आखड्याला दि.११मे रोजी दुपारी आग लागली व मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
  आज रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी तलाठी संतोष शहाणे यांच्या समवेत आगीत खाक झालेल्या आखड्याला भेट दिली व शेतकरी अशोक जांभळे व बंधू यांची भेट घेऊन पाहणी केली व संवाद साधला.
  तलाठी शहाणे यांनी पंचनामा केला व त्याचा अहवाल तयार केला आहे.
   पांडुरंग शिंदे यांनी नायब तहसिलदार वंगवाड यांच्याशी फोन वर  संवाद साधला व शेतकऱ्यांला तात्काळ योग्य ती मदत तहसील कार्यालयात देण्यात यावी अशी विनंती केली.
   यावेळी युवा नेते शिवाजी पा. गायकवाड व परिसरातील शेतकरी,अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...