नांदेड जिल्हा क्रिडा संकुल येथे
अॅथलेटीक्स खेळाडूंसाठी आहार मार्गदर्शन शिबिर संपन्न
बेधडक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
दि.९ मे २०१९,गुरुवार रोजी जिल्हा क्रिडा संकुल,नांदेड येथे
क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य,पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी, नांदेड जिल्हा प्रशिक्षण केंद्र,नांदेड व नांदेड जिल्हा एकविध खेळ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने
विविध खेळांचे उन्हाळी मोफत प्रशिक्षण शिबीरात
खेळाडूंच्या आहाराबदल मार्गदर्शन करण्यात आले.त्यात नांदेड येथील प्रशिध्द बालरोग तज्ञ डॉ.लक्ष्मीकांत बजाज
यांनी खेळाडू चा आहार कसा असला पाहिजे यावर मार्गदर्शन केले.
आणि जिल्ह्यातील खेळाडूंना नांदेड जिल्हा क्रिडा अधिकारी,श्री. राजेश मारावार यांनी खेळाडू ना प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले.प्रमुख पाहुने म्हणुन
डॉ.शाम तेलंग,डॉ.विवेक मोतेवार यांची उपस्थिती होती
श्री.राजेश मारावार (जिल्हा क्रिडा अधिकारी,नांदेड)श्री.गुरुजितशिंग संधु (क्रिडा अधिकारी,नांदेड)श्रीमती.शिवकांता देशमुख (अॅथलेटीक्स प्रशिक्षक,म.रा.)श्री.महेश वाकरडकर (बॅडमिंटन,प्रशिक्षक) श्री.अनिल बंदेल (टेबल टेनिस प्रशिक्षक)
श्री.नारायन आनेराव (अॅथलेटीक्स प्रशिक्षक,एन.आय.एस)यांनी या शिबिराचे आयोजन केले होते.या शिबिरात नांदेड जिल्ह्यातील अॅथलेटीक्स खेळाडू व पालक वर्गाची उपस्थिती होते.
जिल्हा क्रिडा प्रशिक्षण केंद्र,नांदेड च्या माध्यमातून श्रीमती शिवकांता देशमुख ह्या अॅथलेटीक्स खेळाडू साठी प्रशिक्षण हे इंदिरा गांधी मैदान, स्टेडियमवर देत असतात.


No comments:
Post a Comment