मरवाळी येथे छत्रपती शिवाजी महाराजांची 390 वी शिवजयंती जन्मोत्सव सोहळा संपन्न
नांदेड प्रतिनिधी
नायगाव तालुक्यातील मरवाळी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 390 व्या जयंती निमित्ताने शिव व्याख्यानाचे व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते शिव व्याख्यानासाठी सोपान पाटील कदम यांना निमंत्रित करण्यात आले होते सायंकाळी 4:00वाजता छत्रपती शिवाजी राजांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली होती पालखी मिरवणुकीत गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. गावातील माता-भगिनी लहान थोरांनी पालखीतील छत्रपती चे पूजन करुन दर्शन घेतले सायंकाळी 7:00 वाजता संस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते लहान लहान मुलांनी आपल्या कलेतून गावकऱ्यांना मंत्रमुग्ध केले त्यानंतर सोपान पाटील कदम यांचे शिवव्याख्यान झाले या कार्यक्रमास गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न होण्याकरिता स्वराज्य प्रतिष्ठान मित्र मंडळ शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष संजय पाटील चिखले, देशाचे सैनिक गजानन पाटील वडजे, समितीच्या इतर सदस्यांनी मेहनत घेतली.

आम्ही मरवाळीकर
ReplyDelete