Monday, March 30, 2020

नांदेड जिल्ह्यात सापडला कोरोनाचा संशयित रुग्ण

 नांदेड जिल्ह्यात सापडला कोरोनाचा संशयित रुग्ण  




नांदेड एजास कुरेशी
नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील अब्दुल्लापुर वाडी येथे सासरवाडीत आलेल्या जावयाला करोना आसल्या सारखे लक्षन दिसून आल्याने तातडीने उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे नायगाव येथील रहिवासी असलेला एक तरुण पुणे येथे कामासाठी गेला होता आठ दिवसापूर्वी पुणे येथून थेट आपली सासरवाडी  उमरी तालुक्यातील मौजे अब्दुल्लापुर वाडी येथे आला तर हा आठ  दिवसापासून सासरवाडीत राहत  होता या गावातील मित्रा सोबत राहून शेतात ओल्या पार्ट्या केल्या त्याचा आनंद घेत असताना रात्रीला तरुणास खोकला ताप व श्‍वास घेण्यास त्रास होत असल्या ने सदरील तरुणाला ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचार करण्यात आले तरुणावर वैद्यकीय अधीक्षक शंकर चव्हाण, डॉ.चंदापूर, यांनी तपासणी करून उपचार केल्यानंतर तरुणाला अधिक उपचारासाठी रुग्ण वाहिकेद्वारे नांदेड येथे शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे तरुण गेल्या आठ दिवसापासून अब्दुल्लापुर वाडी येथे राहत असताना अनेक नागरिक त्याच्या सहवासात आले आहेत त्यामुळे गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे

 तरुणाला कोरोना संशयित म्हणून नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
या ठिकाणी त्याची तपासणी केली असता कोरोनाचे लक्षणं आढळून आले. त्यामुळे त्याला कोरोनाच्या विशेष वॉर्ड मध्ये ठेवण्यात आले. त्याचे थुंकी अन इतर नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळा येथे पाठविण्यात आले आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वीच नांदेडमध्ये कोरोनाचा संशयित आढळला होता. परंतु तपासणी नंतर त्याचा अहवाल निगेटिव्ह आला होता. 

 तरुणीच्या तपासण्या केल्यानंतर आजार स्पष्ट  होईल त्याबद्दल कुठल्याही प्रकारची नागरिकांनी अफवाह पसरवणे हा गुन्हा आहे.नागरिकांनी  विनाकारण घराबाहेर पडू नये तसेच  स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी
विनाकारण संचारबंदी काळात फिरणार्‍याविरुद्ध कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

1 comment:

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...