भोकर येथील महावितरणाचे भोंगळे कारभारा विरोधात ग्राहकाचे २५ जानेवारीला आमरण उपोषण.
भोकर : - (एजास कुरेशी)
भोकर येथील महावितरणाचे बरेच भ्रष्ट्राचाराचे प्रकरण ताजे असताना सुद्धा अजुन तसाच बेजबाबदार पणे हाताळलेले प्रकरण समोर आले आहे
सविस्तर माहिती अशी की भोकर येथील हातावरचे पोट असलेला सुशिक्षित बेरोजगार पिठाची गिरणी चालवणारा युवक जे की महावितरणाचा ग्राहक मो. आतीखोद्दिन मो. कलिमोद्दीन हे १० वर्षा पासून पीठाची छोटी गिरणी चालवतो त्याचे सर्व कुटुंब ह्याच व्यवसायावर अवलंबून आहे तो ग्राहक विज वितरण कंपनी चा थकित बिल कधीच आज पर्यंत नव्हता दि.२२ अगस्ट रोजी ज्या खांबावरुण कनेक्शन जोड़लेले होते त्या खांबाला आज्ञात ट्रक ने धड़क मारून विद्युत खांबाचे नुकसान केले त्यामुळे वायर तुटले व पीठाची गिरणी बंद पडली सदरील प्रकार विज वितरण कंपनी चे कर्मचारी यांना सांगून सुद्धा वायर जोडून नाही दिले व कोणत्याच प्रकार ची माहिती न देता मीटर ची पी.डी.करण्यात आली. त्याची माहिती गिरणी चालकाला तब्बल 6 महिन्या नंतर देण्यात आली व विज वितरण कंपनी चे दोन कर्मचारी मिटरचे कनेक्शन दूसरी कडून जोडून देण्यासाठी तब्बल २०००० हज़ार रूपयांची लाच मागितली व न दिल्यामुळे व वेळो वेळी चकरा मारून तोंडी विंनती केल्या मुळे दोघांनी ११००० रूपयांचा विज बिल दिला व वेगळे कोटेशन ११००० भरन्यास सांगितले व २०००० रूपयांची लाच मागितली पन वारवार तक्रार देऊन सुद्धा कोणतीच कार्यवाही केली नाही म्हणून संतप्त झालेल्या सुशिक्षित बेरोजगार युवकाने दि२५.१.२०१९ रोजी महावितरण कार्यालय भोकर येथे आमरण उपोषण करण्याचे ठरवले आहे व न्याय नाही मिळाल्यास आत्मदहन करनार असे लेखी तक्रार भोकर येथील महावितरण शाखा कार्यालय, व उप कार्यकारी अभियंता ,व तसेच जिल्हा अधिकारी नांदेड़ व जिल्हा अधीक्षक अभियंता नांदेड़, व पोलीस अधिक्षक नांदेड़ व पोलिस निरीक्षक भोकर यांना देण्यात आला आहे.प्रशासन ह्या संदर्भात काय दखल घेईल ह्या कडे सर्वांचे लक्ष वेधून आहे.

Lay bhari
ReplyDelete