Sunday, January 6, 2019

अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून ; 10 जानेवारीला सुनावणी.

अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून ; 10 जानेवारीला सुनावणी.

विशेष प्रतिनिधि 
अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज महत्त्वपूर्ण सुनावणी होणार होती. मात्र ही सुनावणी सुप्रीम कोर्टाने आता आणखी पुढे ढकलली आहे. या प्रकरणी नव्या पीठाची नियुक्ती होणार असल्याने आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. 10 जानेवारी रोजी नव्या पीठाची नियुक्ती होणार असून त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. सध्या जे पीठ या प्रकरणाची सुनावणी घेत होतं, त्यातील एक न्यायमूर्ती निवृत्त झाल्याने नव्या पीठाची नियुक्ती करणं आवश्यक आहे, यामुळेच या प्रकरणाची सुनावणी 10 जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. अवघ्या 1 मिनिटात सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला आहे.सुप्रीम कोर्टाने नोव्हेंबरमध्ये या प्रकरणाशी संबंधित याचिकांवर लवकर सुनावणी घेण्यास नकार दिला होता. या प्रकरणात जानेवारीपासून सुनावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोर्टाकडे सध्य अन्य प्रकरणेही असल्याचे सांगितले होते. अलाहाबाद हायकोर्टाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने 30 सप्टेंबर 2010 मध्ये 2.77 एकर जमीन तीन पक्षकारांमध्ये म्हणजेच सुन्नी वक्फ बोर्ड, निर्मोही आखाडा आणि राम लल्ला यांच्यामध्ये समान वाटण्याचा निर्णय दिला होता. या निर्णयाविरोधात 14 पेक्षा जास्त याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. सुप्रीम कोर्टाने 9 मे 2011 मध्ये या निर्णयाला स्थिगिती दिली होती.

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...