Sunday, January 6, 2019

पत्रकारांला चाकूचा धाक दाखवून लुबाडले दोन अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल.

पत्रकारांला चाकूचा धाक दाखवून लुबाडले
दोन अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल.


नांदेड:-(एजास कुरेशी)
नांदेड़ येथील मामा चौक परिसरामध्ये फिरायला गेलेल्या एकट्या दुकट्या ना लुटण्याच्या घटना अनेक घडल्या आहेत. काही दिवसने पोलिसांनी परिसरात गस्त  घालण्यास सुरुवात केल्यानंतर हा प्रकार काहीप्रमाणात थांबला होता. मात्र, पुन्हा मामा चौक पासून बाबाजी एरिया परिसरात चोरट्यांनी कमजोर,नविन पुरुषांना चाकूचा धाक दाखवून लुटण्याच्या घटना घडत आहेत. शनिवारी (दि.५) दुपारी तीनच्या सुमारास फिरण्यासाठी गेलेल्या महाविद्यालयीन युवक तथा तरुण तरुणीला चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून बऱ्याच वेळा लुटल्याची घटना खुप वेळा घडली आहे. असाच प्रकार शानिवारी घडला आहे  फिर्यादी माधव मेकेवाड महाविद्यालयी युवक(पत्रकार) वय-२८ यांनी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात घड़लेल्या प्रकाराची रीतसर फिर्याद दिली आहे.
बाँम्ब शोधक पथक ,मामा चौक परिसरात फिरायला गेलेल्या त्या  महाविद्यालयीन युवक तथा पत्रकारास चाकूचा धाक दाखऊन व धमकावून त्यांच्याकडील  ३ हजार २०० रुपयांची नगद लुटून नेल्याची शनिवारी रात्री ८:३० ते ९:०० दरम्यान घडली. चोरट्यांनी गुप्ती सारख्या धारदार शस्त्र ने धमकवल्याने त्यांना लुटण्यास यश मिळाले ही घटना घडून  आल्यानंतर फिर्यादी ने फोन द्वारे कळवले असता तात्काळ  पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला पण स्थानिक ठिकाणचे रहिवासी असल्याने दडपले असल्याची चर्चा यावेळी सुरू होती
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी  शनिवारी रात्री साडे आठ ते नऊ च्या सुमारास कौठा भागात फिरायला गेले होते. त्या वेळी दोन चोरट्यांनी त्यांना अडवले आणि धमकावण्यास सुरुवात केली. चोरट्यांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.  ३ हजार २०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले त्यानंतर चोरटे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. घाबरलेल्या युवकाने रविवारी (दि.6) मध्यरात्री नांदेड ग्रामीण पोलिसांकडे तक्रार दिली.
यापूर्वी तेथील आजू बाजूला  फिरायला येणाऱ्या युगलांना धाक दाखवून लुबाडण्याच्या घटना घडल्या होत्या. त्यातील चोरट्यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर आता पुन्हा बाबाजी का एरिया च्या भागात रात्री ८ पासून मध्यरात्री ला फिरायला गेलेल्यांना लुबाडण्याची घटना घडली आहे़. पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक ए. एल.घाटे अधिक तपास करीत आहेत.

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...