Wednesday, January 9, 2019

पत्रकार रमेश गंगासागरे गुरु रविदास समता पुरस्काराने सन्मानीत.

पत्रकार रमेश गंगासागरे गुरु रविदास समता पुरस्काराने सन्मानीत.


भोकर : (प्रतिनिधि) भोकर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार रमेश गंगासागरे यांना बुलढाणा येथे नुकत्याच झालेल्या पाचव्या अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलनात गुरू रविदास समता पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे.
       पत्रकार रमेश गंगासागरे हे मागील सोळा ते सतरा वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात अनेक समाज उपयोगी लिखाण केले आहे, आपल्या लेखणीच्या माध्यमातून गंगासागरे यांनी तळागाळातील नागरिकांना न्याय देण्याचे कामही केले आहे, या त्यांच्या कार्याची दखल घेत बुलढाणा येथे झालेल्या पाचव्या अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलनात दिनांक ६ जानेवारी २०१९ रोजी पत्रकार दिनाचे औचित्य साधून त्यांना प्राध्यापक लक्ष्मण शिराळे अध्यक्ष संयोजन समिती, इंजिनीयर डी.टी. शिपणे प्रदेशाध्यक्ष, इंजिनिअर चंद्रप्रकाश देगलूरकर संस्थापक अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषद, संमेलनाध्यक्ष डॉक्टर सतनाम सिंह प्रख्यात साहित्यिक तथा लेखक नवी दिल्ली, बाबुरावजी माने अध्यक्ष चर्मकार ऐक्य परिषद, आमदार शशिकांत खेडेकर, खासदार प्रताप जाधव, रविकांत तुपकर स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रदेशाध्यक्ष, यांच्या हस्ते शाल, हार आणि मोमेंटो देऊन सन्मानित करण्यात आले. सलमान पत्रात म्हटले आहे की, माणसाला माणूस म्हणून स्वाभिमानाने जगता आले पाहिजे त्यासाठी समतावादी गुरू रविदास व सर्व क्रांतिकारी महामानवांनी अथक परिश्रम घेऊन भारतात सामाजिक परिवर्तन घडवून आणले, या परिवर्तनाचे आपण एक पाईक आहात आणि प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत नावलौकिक मिळवून इतरांपुढे आदर्श निर्माण केल्याबद्दल आपणास गुरु रविदास समता पुरस्कार आणि जीवन गौरव पुरस्कार देऊन या संमेलनात आपला सन्मान करण्यात येत असल्याचे त्यांनी दिलेल्या गौरव सन्मान पत्रात लिहिले आहे.

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...