वसमत येथे गोळीबार,सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखलवसमत (प्रतिनिधी)
किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणातून दोन गोळ्या झाडुन एकास जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी शहर पोलिसात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे झालेल्या गोळीबारामुळे परिसरात दहशत पसरली आहे
पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की दिनांक 19 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच ते सहा वाजण्याच्या सुमारास किरणसिंग रतन सिंग चव्हाण राहणार रेल्वे स्टेशन रोड वसमत यास आरोपीतानी गैरकायद्याची मंडळी जमवून तुम्ही लिंगाडेला मदत का करता, तुम्हाला लय मस्ती आली असे म्हणून थापड़ बुक्याने मारहाण केली तसेच फिर्यादीचे आई-वडीलास मारहाण करू लागल्याने फिर्यादी हा तेथून पळत कार क्रमांक एम.एच 38 717 मध्ये बसला असता आरोपी हिरासिंग चव्हाण राहणार रेल्वे स्टेशन रोड वसमत याने त्याचे जवळ असलेल्या बंदुकीने फिर्यादीस जीवे मारण्याच्या उद्देशाने दोन गोळी फायर केले या घटनेने परिसरात खळबळ माजली होती
सुदैवाने या गोळीबारात कोणतीही जीवित हानी झाली नाही दरम्यान या प्रकरणी आज दिनांक 29 ऑक्टोबर रोजी किरण सिंग रतन सिंग चव्हाण यांनी वसमत शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून हि-यासिंग भुऱ्यासिंग चव्हाण,भुऱ्यासिंग चतुरसिंग चव्हाण,बाळू उर्फ अविनाश खंदारे,या तीन जणांसह दीपाकौर चव्हाण,अक्कलकौर चव्हाण,कमलकौर चव्हाण या तीन महिलां असे एकूण सहा जण सर्व राहणार रेल्वे स्टेशन रोड वसमत यांच्या विरुद्ध गुरन 355/2018 कलम 307,323,143,147,
148,149,भा.द.वि सह कलम 3/25 आर्म एक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक रवींद्रसिंग धुन्ने यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास फौजदार सदानंद मेंडके हे करीत आहेत

Nice
ReplyDeleteबेस्ट
ReplyDelete