वाराणसीत गोळीबार, दोघांचा मृत्यू
वाराणसीतील कँट परिसरात असलेल्या मॉलमध्ये अज्ञात व्यक्तीकडून करण्यात आलेल्या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार, कँट परिसरातील जेव्हीएच मॉलमध्ये एका अज्ञात व्यक्तीनेगोळीबारकेला. या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर, अनेक जण जखमी झाले आहे. जखमींना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खरेदी करण्यासाठी लोकांनी मॉलमध्ये गर्दी केली होती. मात्र, गोळीबाराचा आवाज आल्यानंतर लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.
No comments:
Post a Comment