बेवारस लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करा - इंटरनेशनल ह्यूमन राइट्स काँन्सिल
परभणी शहरातील रेल्वे स्टेशन परिसर, बस स्टॅंड परिसर ई. सार्वजनिक ठिकाणी बेवारस, बेसहारा लोक ज्यांच्या अन्न, वस्त्र ,निवारा इ. मूलभूत गरजा पूर्ण होत नाही त्यांच्या व्यवस्थापनासाठी तसेच जनावरा पेक्षाही अतिशय दयनीय अवस्था ज्या निराधार लोकांची झालेली आहे, त्यांच्या राहण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात यावी जेणे करून त्यांचे राहणीमान सुधारले जातील, या मागणी करिता इंटनँशनल ह्यूमन राइट्स कॉंसिल टीम परभणी च्या वतीने उप जिल्हाअधिकारी डॉ. संजय कूंडेटकर यांच्या कडे देण्यात आले निवेदन देतांना IHRC चे जिल्हा अध्यक्ष वाजेद खान, जिल्हा सचिव मो. अजहर फारोखी, जन संपर्क अधिकारी अॅड.शेख रियाज़ व सदस्य शेख रफीक इतर कार्यकर्तेही उपस्थित होते.

No comments:
Post a Comment